मुंबई: राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था व खाजगी अनुदानित व विनाअनुदानित शाळांमधील शिक्षक व शिक्षकांना आता शाळेला धरून असलेला ड्रेस कोड मध्येच वापरावे लागणार आहे. राज्य सरकारच्या शालेय व क्रीडा विभागाच्या वतीने याबाबतचा आदेश जाहीर केला आहे राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थेतील शाळांना हा निर्णय बंधनकारक करण्यात आला आहे.
शिक्षक देशाची भावी पिढी घडवत असतात तसेच जनमानसात त्यांच्याकडे गुरु मार्गदर्शक अशा आजाराने पाहिले जाते. या शिक्षकांचा संबंध हा विद्यार्थी पालक व गावातील प्रतिष्ठित व्यक्ती व लोकप्रतिनिधी यांच्याशी येत असतो. तसेच त्यांच्यासोबत संवाद होत असतो अशावेळी त्यांची वेशभूषा व व्यक्तिमत्त्वाचा भाग महत्त्वाचा असतो. शिक्षकांना वेशभूषेवरून त्यांच्या पदाची विशिष्ट छाप पडत असते. त्यामुळे शाळेमुळे विद्यार्थ्यांना अध्यापनाचे काम करत असताना वेशभूषा बद्दल जागरूक राहून आपली वेशभूषा आपल्या शाळेस व पदारमस किमान अनुरूप ठरेल याची काळजी घेणे अभिप्रेत आहे.
महिला शिक्षिकांना साडी अथवा सलवार चुडीदार कुर्ता दुपट्टा अशा पद्धतीने पेहराव करावा. पुरुष शिक्षकांनी शर्ट आणि ब्राउझर व शर्ट इन करावा. गडद रंगाचे चित्र विचित्र नक्षीकाम चित्रे असलेला पेहराव करू नये. तसेच शिक्षकांनी जीन्स व टी-शर्ट वापर शाळेमध्ये करू नये अशा सूचना देण्यात आले आहेत. या शिवाय शाळेने सर्व शिक्षकांकरिता एक ड्रेस कोड व रंगसंगती ठरवावी. महिला व पुरुष शिक्षकांच्या शर्टच्या रंग फिकट तर पॅन्टचा रंग गडद असावा. महिला पुरुष शिक्षकांच्या पोशाखला शोभतील अशी पादत्रीने वापरावीत स्काऊट गाईडच्या शिक्षकांना स्काऊट गाईडचा ड्रेस राहील.



