पिंपरी : लोकसभा निवडणुकीचे बिगुल आज शनिवारी दुपारी तीन वाजता वाजण्याची दाट शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर महायुती व महाविकास आघाडी यांच्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. राज्यात महायुतीत आता मनसे सहभागी करून घेत असल्याचे माहिती समोर आले आहे. तर जागा वाटपाच्या बिघाडीमुळे महाविकास आघाडीतून वंचित आघाडी बाहेर पडले असल्यास दिसून येत आहे.
राज्यात भाजपने पहिले 20 लोकांची यादी जाहीर केले आहे. पुढील 28 जागांसाठी सत्तेतील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेना व उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जागा वाटपासह आता मनसे पक्षालाही जागा देण्याच्या हालचाली सुरू आहेत तर महाविकास आघाडी सोबत महादेव जानकर यांचा राष्ट्रीय समाज पक्ष व प्रकाश आंबेडकर यांची वंचित बहुजन आघाडी यांच्यासोबत वाटाघाटी सुरू आहेत. परंतु वंचितच्या मागण्यामुळे त्यांनी आघाडी सोबत जाण्यास विरोध दर्शवला आहे.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे मागील काही दिवसापासून हिंदुत्वाचा मुद्दा जोरदारपणे मांडत आहेत 2019 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विरोध करताना “लाव रे तो व्हिडिओ” यामुळे संपूर्ण राज्यात राज ठाकरे यांची जोरदार चर्चा झाली होती. आता मोदींना केलेला विरोध त्यांचा मागील काही दिवसापासून मावळला आहे असे दिसते. याशिवाय उद्धव ठाकरे यांच्यासोबत भाजप नसल्याने ठाकरे नावाचे मॅजिक आणि मराठी मायग्रेट दुरावल्याचही उणीव भाजपला दिसून येत आहे. तर राज ठाकरे भाजप सोबत आल्यास त्यांच्या नावाचा करिष्मा लोकसभेसह विधानसभा व मुंबई महापालिका निवडणुकात उपयोगी पडेल असा विचार भाजप नेतृत्व करताना दिसत आहे तर मागील लोकसभा निवडणुकीत वंचित फॅक्टर महत्त्वाचा ठरला होता तो आपल्याकडे करण्यासाठी महाविकास आघाडीला यश येताना दिसत नाही त्यामुळेच मनसे इन आणि वंचित आउट असे चित्र एकंदरीत दिसत आहे.



