नवी दिल्ली : दिल्लीच्या सराय रोहिल्ला पोलीस ठाण्यांतर्गत इंद्रलोक परिसरात रस्त्यावर नमाज पढणाऱ्या मुस्लीम व्यक्तींना लाथ मारल्याचं प्रकरण न्यायालयात पोहोचलं आहे. या प्रकरणी स्थानिक न्यायालयात 1 मे रोजी सुनावणी होणार आहे. या संदर्भात उत्तर दिल्लीचे डीसीपी मनोज कुमार मीणा यांच्याकडून घटनेचा अहवाल मागवण्यात आला आहे.
गेल्या शुक्रवारी 8 मार्च रोजी मुस्लिम समाजातील लोक मोठ्या संख्येने मशिदीत नमाज अदा करण्यासाठी आले होते. गर्दीमुळे काही लोकांनी मशिदीबाहेर रस्त्यावर बसून नमाज अदा करण्यास सुरुवात केल्याने रस्त्यावर वाहतूक कोंडी झाली होती. हे पाहून पोलिस उपनिरीक्षकाने त्याला लाथ मारून तेथून हाकलण्याचा प्रयत्न केला, मात्र व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर त्याला तत्काळ निलंबित करण्यात आले.

दिल्लीच्या नमाज प्रकरणात पोलिसांचं स्पष्टीकरण; पोलिस उपनिरीक्षकावर हल्ला झाल्याचा दावा
या प्रकरणाची पुढील सुनावणी १ मे रोजी दिल्लीतील तीस हजारी न्यायालयात होणार आहे. या संदर्भात न्यायालयाने इंद्रलोकच्या संबंधित डीसीपींकडून घटनेचा सविस्तर अहवाल मागवला आहे. शुक्रवार, 8 मार्च रोजी, सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये एक SI कथितपणे मक्की जामा मशिदीजवळ नमाज अदा करणाऱ्या लोकांना लाथ मारताना दिसला. सोशल मीडियावर निदर्शने आणि संतापानंतर 8 मार्च रोजी एसआयला निलंबित करण्यात आले होते; सध्या या घटनेची चौकशी सुरू आहे.



