नवी दिल्ली : स्मार्टफोन मॅन्यूफॅक्चरिंगमध्ये चीन आजही मजबूत आहे. पण त्यांची ही मोनोपोली तोडण्यासाठी अमेरिकन कंपन्या चीन सोडून भारतात आल्या. भारतातून उत्पादन सुरु केलं. त्याचे निकाल आता समोर येऊ लागले आहेत. भारताने काही वर्षातच चीनला त्यांची जागा दाखवून देण्यास सुरुवात केली आहे.
एका रिपोर्ट्नुसार भारत आता दर तासाला अमेरिकेला 4.43 कोटी रुपयाचे स्मार्टफोन निर्यात करत आहे. विशेष म्हणजे मागच्यावर्षीच्या एक्सपोर्टच्या तुलनेत हा एक्सपोर्ट 253 टक्क्यांनी वाढला आहे. स्मार्टफोन एक्सपोर्ट संबंधीचा हा रिपोर्ट समजून घेऊया.
चालू आर्थिक वर्षात एप्रिल ते डिसेंबर दरम्यान भारतातून अमेरिकेला होणाऱ्या स्मार्टफोनची निर्यात वाढली आहे. ही निर्यात वाढून 3.53 अब्ज अमेरिकी डॉलरपर्यंत पोहोचली आहे. 2022-23 मध्ये एवढ्याच काळात ही निर्यात 99.8 कोटी अमेरिकी डॉलर होती. व्यापार मंत्रालयाच्या आकड्यांनुसार, चालू आर्थिक वर्षात एप्रिल ते डिसेंबर दरम्यान स्मार्टफोनच्या निर्यातीत भारताचा हिस्सा वाढून 7.76 टक्के झालाय. मागच्या आर्थिक वर्षात याच काळात निर्यात दर 2 टक्के होता. एका अधिकाऱ्याने सांगितलं की, स्मार्टफोन निर्मिती वाढल्याने ही निर्यात वाढली आहे.




