नवी दिल्ली : तुमचा आयफोन लवकरच Walkie-Talkie होईल. मायक्रोसॉफ्ट Teams ऐप च्या मदतीने हा करिष्मा होईल. आयफोनमध्ये व्हाईस इंटरॅक्शनसाठी एक नवीन फीचर आणण्याची तयारी कंपनीने केली आहे. त्यामुळे iPhone लवकरच वॉकी-टॉकी सारखे काम करेल. एका रिपोर्टनुसार, Microsoft च्या टीम्स ऐपमध्ये आयफोनसाठी वॉकी -टॉकी हे फीचर इंटिग्रेट करण्याची योजना आहे हे फीचर तुम्हाला आयफोनमध्ये मे महिन्यापर्यंत मिळू शकते. त्यामुळे आयफोनधारकांना त्यांचा स्मार्टफोन एखाद्या Walkie-Talkie सारखा वापरता येईल
अशी मिळेल ही सुविधा
बिझनेस टुडेच्या वृत्तानुसार, या नवीन फीचरमुळे युझर्सला सेफ वॉईस कम्युनिकेशनचा अनुभव घेता येईल. आयफोन युझर्स हे फीचर त्यांचा फोन लॉक असतान पण वापरु शकतील. त्यांना लॉक स्क्रीन असताना पण वॉकी-टॉकीचे फीचर वापरता येईल. या इंटिग्रेशन मे महिन्यात आयफोन धारकांना मिळण्याची दाट शक्यता आहे. अर्थात डेव्हलपर्स त्यासाठी अधिक काळ लागू शकतो, असे सांगत आहे. काही तांत्रिक चुका टाळण्यासाठी काही काळ लागणार आहे.
या वॉकी-टॉकी फीचरसाठी मायक्रोसॉफ्ट कंपनी एप्पलच्या पुश-टू-टॉक फ्रेमवर्कचा वापर करणार असल्याचे समोर येत आहे. iOS आणि एंड्रायड प्लेटफॉर्मवर Microsoft Teams साठी जीसीसी क्लाउड इंस्टेंसवर त्याचा सहज वापर करता येईल. आईडी 388486 कडून ओळख पटविण्यासाठी मायक्रोसॉफ्ट 365 रोडमॅपचा नुकताच वापर करण्यात आला होता. हे टीम्सचा वापर वाढण्यासाठी फार मोठे पाऊल असल्याचे सांगण्यात येत आहे.




