मुंबई : भाजप आणि शिवसेनेच्या सर्व्हेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे तीन विद्यमान खासदारांची जागा धोक्यात आहे असल्याचं समोर आलं होत. तर पालघरचे राजेंद्र गावीत भाजपमधून आलेले उमेदवार आहेत, त्यामुळे ही जागा भाजपाला जावू शकते किंवा गावीत पुन्हा शिवसेनेचे उमेदवार असू शकतात.
कोणत्या जागेवर कोणाला मिळणार उमेदवारी?
१) हेमंत पाटील , हिंगोली
२) श्रीरंग बारणे, मावळ
३) भावना गवळी, वाशिम ( यांना मिळू शकतो डच्चू यांच्या जागी संजय राठोड यांना उमेदवारी मिळू शकते )
४) धैर्यशील माने, हातकणंगले
५) सदाशिव लोखंडे, शिर्डी
६) हेमंत गोडसे, नाशिक
७) कृपालजी तुमाणे, रामटेक (यांना मिळू शकतो डच्चू )
८) श्रीकांत शिंदे, कल्याण
९) राहुल शेवाळे, इशान्य मुंबई
१०) राजेंद्र गावीत, पालघर ( गावीत हे भाजपातून आलेले उमेदवार त्यामुळे ही जागा भाजपाला जावू शकते किंवा गावीत पुन्हा शिवसेनेचे उमेदवार असु शकतात )
११) प्रतापराव जाधव, बुलढाणा
१२) संजय मंडलिक, कोल्हापूर ( यांना मिळू शकतो डच्चू )
राज्यात भाजप लोकसभेच्या ३१ ते ३२ जागा लढविण्यावर ठाम होतं. तर शिवसेना शिंदे गटाला १२ ते १३ जागा आणि अजित पवार गटाला ४ जागा देण्याबाबत भाजपच्या वरिष्ठ नेत्यांचा विचारविनिमय सुरू होता.जागावाटपाचा अंतिम निर्णय हा दिल्लीत होणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे. उमेदवार निवडीमध्ये महायुतीकडून धक्कातंत्र वापरण्याची शक्यता असून अनेक विद्यमान खासदारांचं तिकीट कापलं जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे शिंदे गटासह भाजपच्या विद्यमान खासदारांमध्ये धाकधूक आहे.



