
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाच्या महिला संघाने नुकतेच महिला प्रीमियर लीग 2024 स्पर्धेचे विजेतेपद जिंकले. बंगळुरू फ्रँचायझीचे हे गेल्या 16 वर्षातील पहिले विजेतेपद ठरले आहे. यापूर्वी या फ्रँचायझीला कोणत्याच स्पर्धेचे विजेतेपद जिंकता आलेले नव्हते. त्यामुळे या फ्रँचायझीमधील पुरुष खेळाडूंनी महिला संघावर स्तुतीसुमने उधळली.
बंगळुरूचा स्टार क्रिकेटपटू विराट कोहलीने स्मृती मानधनाच्या नेतृत्वातील महिला बंगळुरू संघाचे कौतुक केले आहे. त्याचबरोबर त्याने बंगळुरू फ्रँचायझीच्या चाहत्यांचेही कौतुक करताना म्हटले की, जर आयपीएलही जिंकलो, तर ते खूप विशेष असेल. तो अनुभव मला नक्कीच घ्यायला आवडेल असेही तो म्हणाला.




