लोकसभा निवडणुकीची इंडिया आघाडीचे जागावाटप अजुनही झालेले नाही, काल काँग्रेसची एक बैठक झाल्याचे सांगण्यात येत आहे. या बैठकीत महाराष्ट्रातील जागावाटपाचा तिढा सुटल्याचे बोलले जात आहे. सांगली लोकसभेच्या जागेवरुन ‘शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे’ पक्ष आणि काँग्रेसने या दोन्ही पक्षांनी दावा सांगितला आहे. शिवसेनेने पैलवान चंद्रहार पाटील यांना सांगली लोकसभेची तयारी करण्यास सांगितले होते, तर काँग्रेसचे विशाल पाटीलही तयारी करत होते, त्यामुळे सांगली लोकसभेची उमेदवारी कोणाला मिळणार याची चर्चा सुरू आहे.
दुसरीकडे, काल पैलवान चंद्रहार पाटील यांनी महाविकास आघाडी कोणाला उमेदवारी देईल त्यांचा प्रचार करणार असं जाहीर केले आहे. त्यामुळे आता सांगलीची जागा काँग्रेस लढवणार असल्याच्या जोरदार चर्चा सुरू आहेत. याबाबत काल चंद्रहार पाटील यांनी माध्यमांशी बोलताना संकेत दिले आहेत.




