
काल दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना ईडीने मद्य घोटाळा प्रकरणात अटक केली. याविरोधात आम आदमी पक्ष देशभरात निदर्शने करणार आहे. लोकसभा निवडणुकीच्या आधीच ईडीने ही कारवाई केली आहे. आज सीएम केजरीवाल यांना ईडी कोर्टासमोर हजर करणार आहे.
आज देशभरात आप निदर्शने करणार असल्याची घोषणा आपचे नेते गोपाल राय, सौरभ भारद्वाज, संदीप पाठक यांनी पत्रकार परिषद घेऊन केली. आमची लढाई रस्त्यावरुन कोर्टापर्यंत राहणार असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
“आज देशात भाजप सरकारविरोधात कोण काही बोलले की लगेच त्याला अटक केले जाईल, भाजपने करोडो लोकांचा अपमान केला आहे. ही दिल्लीच्या दोन कोटी लोकांची अटक आहे. देशाच्या लोकशाहीवर प्रेम करणाऱ्याला अटक केली आहे, असंही त्यांनी पत्रकार परिषदेत म्हटले.



