मुंबई : महाराष्ट्रातील पहिल्या टप्प्यातील लोकसभा निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली असली, तरी महाविकास आघाडीतील जागावापाचा तिढा अजून सुटलेला नाही. सांगली, भिवंडी, रामटेक व मुंबईतील दोन जागांवरील शिवसेना ( ठाकरे गट ) व राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) आपला दावा सोडायला तयार नसल्यामुळे काँग्रेसची कोंडी झाली आहे.

शरद पवार यांच्या उपस्थितीत गुरुवारी झालेल्या महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांच्या बैठकीतूनही जागावाटपाच्या वादावर तोडगा निघू शकला नाही. शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसच्या आक्रमकतेपुढे काँग्रेस नेते काहिसे हतबल झाले असल्याचे चित्र आहे. परंतु एक दोन दिवसात सगळे प्रश्न मिटतील व जागावाटपाची एकत्रित घोषणा केली जाईल, असे प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी सांगितले.