पुणे – पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने ड्रग विक्रीचा कारखाना आणि वितरणाचे जाळे उधवस्त केल्यावर आता पेडलरकडे (किरकोळ विक्रेते) लक्ष केंद्रीत केले आहे. समर्थ पोलीस ठाण्याच्या हद्दीत छापा टाकताना एका पेडलरला पोलिसांना पाहून ह्रदयविकाराचा झटका आला. त्यात त्याचा मृत्यू झाला.
५२ वर्षाचा पेडलर पोलिसांच्या रेकॉर्डवरील आहे, त्याच्यावर पूर्वी ड्रग विक्रीचे गुन्हे दाखल आहेत. सर्च ऑपरेशन दरम्यान तो नाना पेठेतील घरी असल्याची खबर मिळाली. पोलिसांनी दरवाजा वाजवल्यावर त्यानेच तो दरवाजा उघडला. आणि आपल्या दारात पोलिसांचे पथक दिसताच त्याला मोठा धक्का बसत हृदयविकाराचा झटका आल आणि तो दारातच कोसळला.
पोलिसांनी आणि घरच्यांनी त्याला रुग्णालयात दाखल केले, तेथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषीत केले. त्याच्या घराची झडती घेतली असता तेथे काही ग्रॅम ड्रग सापडले. याप्रकरणाची समर्थ पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.



