मुंबई : माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्यानंतर आता उमरेड विधानसभा क्षेत्राचे आमदार राजू पारवे यांनी काँग्रेसला ‘हात’ दाखवत शिवसेनेचा धनुष्यबाण हातात घेतला आहे. त्यांना रामटेक लोकसभेची उमेदवारी मिळणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. यामुळे काँग्रेसच्या रश्मी बर्वे व पारवे यांच्यात सामना होणार आहे.
रविवारी मुंबईत त्यांनी एकनाथ शिंदेच्या शिवसेनेत अधिकृत प्रवेश केला. गेल्या अनेक दिवसापासून पारवे काँग्रेस सोडणार असल्याची चर्चा होती. त्याला आज पूर्णविराम मिळाला. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील महाविकास आघाडी सरकार कोसळलं आणि एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वात महायुतीची सत्ता आली. सरकारकडून अनेक कामांवर स्थगिती देण्यात आली होती. परंतु पारवे यांच्या मतदार संघातील कामांना मंजुरी मिळाली होती.



