छत्रपती संभाजीनगर : मला असं वाटतं की, आता अमरावतीचं काही राहिलेलं नाही. अमरावतीचं पोस्टमार्टम झालं आहे. फक्त निकाल बाकी आहे आणि तो म्हणजे प्रहारचाच आहे. मी पहिलं सांगितलं की आमची लढत ही मैत्रीपूर्ण आहे. अमरावती जिल्ह्यामध्ये तरी आता पुढचा निर्णय युतीने घ्यावा की, आमची आणि त्यांची लढत त्यांच्या विरोधात नाही. आम्ही युतीतून बाहेर जावं की राहावं तो त्यांचा निर्णय सध्या महायुतीकडे आहे. त्यांनी जो निर्णय घेतला त्याचं मी स्वागत करतो. नवनीत राणा यांच्याबद्दलचा राग आहे. 100 पानांचा हायकोर्टाचा निकाल दिलाय. त्यात त्यांनी स्पष्ट सांगितलं आहे की, याच्यामध्ये सगळी बनवाबनवी झालेली आहे.
गुन्हे दाखल करण्यापासून हा देशद्रोह आहे इथपर्यंत म्हटलं असताना, अडीच वर्षे सर्वोच्च न्यायालय निकाल देत नाही आणि मग कोर्टात केस पेंडिंग असतानाही इथे उमेदवारी दिल्या जातील. या तानाशाहीच्या विरोधात आमची खरी लढाई असल्याचं बच्चू कडू यांनी सांगितलं. दरम्यान, रवी राणांची जी वागणूक आहे ती अतिशय राग येणार आणि संताप आणणारं आहे. यामुळे कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड नाराजी आहे. मी स्वतःचा अपमान सहन करेन पण कार्यकर्त्यांचं काय? त्यामुळे आमचा प्रहार पक्ष कायम राहिला पाहिजे म्हणून आम्ही अमरावतीमधून उमेदवारी दिली आहे.



