अहमदनगर: आज देशात अनेक प्रश्न प्रलंबित आहेत तरी काही जण म्हणतात आम्ही काम करण्यासाठी सत्तेत जात आहोत. सत्तेसाठी लाचारी स्वीकारणे योग्य नाही अशी ठाम भूमिका प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी यावेळी मांडली.
राजकारणात विचार आणि आचार फार महत्वाचे असतात. पवारसाहेब, उद्धव ठाकरे यांच्या मागे लोक मोठ्या ताकदीने उभे आहे. पवार साहेब, उद्धव ठाकरे आणि राहुल गांधी परिस्थिती बदलू शकतात यावर लोकांचा ठाम विश्वास आहे, असेही ते म्हणाले.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार निलेश लंके यांनी आज पाथर्डी येथे मोहटादेवीचे आशीर्वाद घेत आपल्या प्रचाराचा नारळ फोडला. स्वाभिमानी जनसंवाद यात्रेच्या माध्यमातून निलेश लंके आपला प्रचार करणार आहेत. या यात्रेचाही आज प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत शुभारंभ झाला.



