मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उर्वरित लोकसभा उमेदवार आज जाहीर होण्याची शक्यता आहे. पवार गटाची दुसरी यादी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आज जाहीर करण्याची चिन्हं आहेत. शिवसंग्राम नेत्या आणि दिवंगत विनायक मेटे यांच्या पत्नी ज्योती मेटे या शरद पवार यांच्या भेटीसाठी सिल्वर ओक येथील निवासस्थानी पोहोचल्या आहेत. पवार गटाच्या लोकसभा उमेदवार यादीतील काही संभाव्य नावं समोर आली आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेस : शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आज शरद पवारांशी सिल्वर ओक येथे चर्चा करत आहेत. लोकसभा उमेदवारांच्या नावांची अंतिम यादी तयार करून दुपारी पत्रकार परिषद घेत ते या संदर्भात जाहीर घोषणा करतील. आतापर्यंत पवारांनी पाच उमेदवार जाहीर केले आहेत. आज आणखी पाच जणांची घोषणा झाल्यास हा आकडा दहावर जाईल.



