
मुंबई : शिवसेना ठाकरे गटाची लोकसभा निवडणुकीसाठी दुसरी उमदेवार यादी जाहीर झाली आहे. कल्याण, पालघर, हातकणंगले आणि जळगाव या चार जागांसाठी ही उमेदवारांची यादी जाहीर केली. हातकणंगले लोकसभा मतदारसंघात ठाकरेंनी सत्यजीत पाटील यांना उद्धव ठाकरेंनी तिकीट दिले आहे.
हातकणंगले जागेवर स्वाभिमानी पक्षाचे शेतकरी नेते यांनी ठाकरे गटाकडे पाठिंबा मागितला होता. मात्र, ठाकरे गटाकडून राजू शेट्टी यांना मशाल चिन्हावर निवडणूक लढण्याची विनंती केली होती. याला राजू शेट्टी यांनी नकार दिला होता. त्यामुळे आता ठाकरे गटाकडून सत्यजित पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे. दुसरीकडे, या मतदारसंघात शिंदे गटाच्या शिवसेनेचे विद्यमान खासदार धैर्यशील माने यांना पुन्हा मैदानात उतरविले आहे. त्यामुळे या मतदारसंघात तिरंगी लढत होणार आहे.
हातकणंगले लोकसभा मतदारसंघात स्वाभिमानी पक्षाचे शेतकरी नेते राजू शेट्टी यांचे वर्चस्व आहे. परंतु २०१९ च्या निवडणुकीत त्यांचा धैर्यशील माने यांनी पराभव केला होता. आता पुन्हा धैर्यशील माने निवडणुकीच्या रिंगणात आहेत. तसेच, आता ठाकरे गटाकडून सत्यजीत पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे. दरम्यान, दुसऱ्या यादीत कल्याण लोकसभा मतदार संघातून वैशाली दरेकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर पालघरमधून भारती कामडी आणि जळगावमधून करण पवार यांना ठाकरे गटाकडून उमेदवारी देण्यात आली आहे.
ठाकरे गटाची पहिली उमेदवार यादी
- बुलढाणा – नरेंद्र खेडेकर
- यवतमाळ-वाशिम – संजय देशमुख
- मावळ – संजोग वाघेरे-पाटील
- सांगली -चंद्रहार पाटील
- हिंगोली – नागेश पाटील आष्टीकर
- छत्रपती संभाजीनगर – चंद्रकांत खैरे
- धाराशिव – ओमराजे निंबाळकर
- शिर्डी- भाऊसाहेब वाघचौरे
- नाशिक – राजाभाई वाजे
- रायगड – अनंत गीते
- सिंधुदुर्ग-रत्नागिरी – विनायक राऊत
- ठाणे – राजन विचारे
- मुंबई-ईशान्य – संजय दिना पाटील
- मुंबई-दक्षिण – अरविंद सावंत
- मुंबई-वायव्य – अमोल कीर्तिकर
- परभणी – संजय जाधव
- मुंबई दक्षिण मध्य – अनिल देसाई



