कर्नाटक उच्च न्यायालयात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तींसमोर एका व्यक्तीने कापला गळा कापत आत्महत्या करण्याता प्रयत्न केला. म्हैसूर येथील एका ५१ वर्षीय व्यक्तीने कोर्टात चाकूने गळा कापण्याचा प्रयत्न केल्याने कर्नाटक उच्च न्यायालयात अचानक गोंधळ उडाला. बुधवारी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास न्यायालय क्रमांक 1 मध्ये ही घटना घडली. कर्नाटक उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती एनव्ही अंजारिया आणि न्यायमूर्ती एचबी प्रभाकर शास्त्री यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणाची सुनावणी सुरू होती.
म्हैसूरमधील विजयनगरातील एस चिन्नम श्रीनिवास या व्यक्तीला आत्महत्येच्या प्रयत्नानंतर बॉरिंग हॉस्पिटलमध्ये उपचारांसाठी दाखल करण्यात आले, तेथे डॉक्टरांनी त्याच्यावर शस्त्रक्रिया करून त्याला निरीक्षणाखाली ठेवले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, श्रीनिवास नावाचा व्यक्ती कोर्ट रूममध्ये गेला आणि त्याने काही फाईल्स कोर्टाच्या अधिकाऱ्याला दिल्या. त्याने खंडपीठात काही शब्द बोलले आणि अधिकाऱ्यांनी त्याला कामकाजात अडथळा आणण्यापासून रोखण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्याने चाकू काढला आणि स्वतःचाच गळा चिरला. या घटनेने हादरलेल्या खंडपीठाने न्यायालयीन कर्मचाऱ्यांना न्यायालयाच्या कक्षाबाहेर कर्तव्यावर उपस्थित असलेल्या पोलिसांना माहिती देण्यास सांगितले. पोलिसांनी आत जाऊन त्याला रुग्णालयात नेले.




