
रिलायन्स पॉवरच्या (Reliance Power) शेअर्सनं रॉकेट स्पीड पकडला आहे. अनिल अंबानींच्या कंपनी रिलायन्स पॉवरचा शेअर गुरुवारी 5 टक्क्यांनी वाढून 33.43 रुपयांवर पोहोचला. कंपनीच्या शेअर्सनं 52 आठवड्यांचा नवा उच्चांकी स्तर गाठला आहे. रिलायन्स पॉवरचे शेअर्स सलग तिसऱ्या दिवशी अपर सर्किटवर पोहोचलेत. या वर्षी 13 मार्चपासून रिलायन्स पॉवरचे शेअर्स 64% वाढलेत. त्याच वेळी, गेल्या 4 वर्षांत कंपनीच्या शेअर्समध्ये 2800% पेक्षा जास्त वाढ झाली आहे. रिलायन्स पॉवरच्या शेअर्सची 52 आठवड्यांची नीचांकी पातळी 10.30 रुपये आहे.
4 वर्षांत 2858% वाढ
गेल्या 4 वर्षांत रिलायन्स पॉवरच्या शेअर्समध्ये मोठी वाढ झाली आहे. 27 मार्च 2020 रोजी कंपनीचे शेअर्स 1.13 रुपयांवर होते. 4 एप्रिल 2024 रोजी रिलायन्स पॉवरचे शेअर्स 33.43 रुपयांवर पोहोचले. गेल्या 4 वर्षात कंपनीच्या शेअर्समध्ये 2858 टक्क्यांची मोठी वाढ झाली आहे. जर एखाद्या व्यक्तीनं 27 मार्च 2020 रोजी कंपनीच्या शेअर्समध्ये 1 लाख रुपये गुंतवले असतील आणि त्याची गुंतवणूक कायम ठेवली असेल तर आजcas त्या शेअर्सचं सध्याचं मूल्य 29.58 लाख रुपये झालं असतं.




