पिंपरी : बारामती लोकसभा मतदारसंघात माहितीचा उमेदवार समोर येईपर्यंत मतदारांच्या मनात वेगवेगळे विचार होते. सुरुवातीला महायुतीच्या उमेदवाराबबत नागरिकांचा कल समोर येत नव्हता. मात्र देशातील काम करणारे मोदी सरकार मधून पंतप्रधानपदी नरेंद्र मोदी साहेब पाहिजे का विरोधी पक्षाकडून पंतप्रधान म्हणून राहुल गांधी पाहिजे असा विचार जेव्हा समोर आला तेव्हा नागरिकांचा कल नरेंद्र मोदी यांच्याच बाजूने आहे असे जाणवले. यामुळे बारामती लोकसभा मतदार संघात निवडणूक पवार विरुद्ध पवार नसून मोदी विरुद्ध गांधी अशी होताना दिसत आहे.
बारामती लोकसभा मतदारसंघातून अजित पवार यांना भाजपचे इंदापूरचे नेते हर्षवर्धन पाटील पुरंदरचे माजी आमदार शिवतरे यांच्याकडून कडून विरोध झाला बारामती लोकसभा मतदारसंघासाठी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपच्या सर्व आमदारांचा मेळावा इंदापूर येथे घेतला यावेळी त्यांनी बारामतीची निवडणूक ही दोन व्यक्तींमध्ये नसून केंद्रातील नरेंद्र मोदी विरुद्ध राहुल गांधी अशी आहे आपण नरेंद्र मोदी साहेब यांना पुन्हा तिसऱ्यांदा पंतप्रधान बनवण्यासाठी महायुतीचा उमेदवार निवडून देणार आहे असे सांगून नागरिकांच्या मनामधील विधा अवस्था पुसून टाकण्याचा प्रयत्न केला याच धाग्याला पकडून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज पिंपरी चिंचवड शहरात आल्यानंतर माध्यमांशी बोलताना बारामतीची निवडणूक ही मोदी वरुद्ध गांधी अशी आहे असे सांगितले.




