
सातारा : महाविकास आघाडीने शाहू महाराजांना घरी जाऊन उमेदवारी मात्र माझी अद्याप उमेदवारीजाहीर झाली नाही त्यात वाईट मानायचं कारण नाही. मला उमेदवारी मिळणार हे निश्चित आहे असे उदयनराजेंनी सांगितलं आहे. मात्र उदयनराजेंची उमेदवारी जाहीर न झाल्याने त्यांच्या समर्थकांमध्ये नाराजी आहे. कोल्हापूरच्या छत्रपती शाहू महाराजांना महाविकास आघाडीने घरी जाऊन उमेदवारी दिली असताना साताऱ्याच्या उदयनराजेंची उमेदवारी लांबणीवर पडत असल्याने कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता आहे.
कोल्हापुरच्या शाहु महाराजांच्या उमेदवारीबद्दल मी त्यांचे स्वागतच करतो. मला लवकर उमेदवारी दिली नाही. यात वाईट मानायचे काहीच कारण नाही. ही लोकशाही आहे. लोकशाहीत थोडं पुढे-मागे होतं. ज्यावेळेस चर्चा होते. त्या चर्चेतुनच काहीतरी चांगल घडतं, असे उदयनराजे भोसले म्हणाले. महायुतीमधील घटक पक्ष असलेल्या भाजपने आज दहावी यादी जाहीर करूनही सातारा लोकसभेसाठी इच्छुक असलेले उमेदवार उदयनराजे भोसले यांना ‘अजूनही प्रतीक्षेत ठेवले आहे.



