)
जालना : जालना लोकसभा मतदारसंघात रावसाहेब दानवे यांना काँग्रेसचे डॉ कल्याण काळे यांचं कडवं आव्हान असणार आहे. काँग्रेस हायकमांडनं कल्याण काळे यांच्या नावाची घोषणा केल्यानं हा संभ्रम दूर झाला आहे. आता कल्याण काळे 2009 च्या पराभवाचा बदला घेणार का, अशी चर्चा करण्यात येत आहे.
मतदार संघातील कार्यकर्त्यांसह सर्वसामान्य मतदारांमध्ये संभ्रम होता. काँग्रेसचे बडे नेते गुडघ्याला बाशिंग बांधून लोकसभेच्या आखाड्यात उतरण्याच्या तयारीत होते. मात्र काँग्रेसनं बुधवारी पत्रकार परिषद घेत जालन्याची जागेवर काँग्रेस उमेदवार कल्याण काळे यांच्या नावाची अधिकृत घोषणा केली.
कल्याण काळे घेणार का 2009 च्या पराभवाचा बदला
काँग्रेसकडून जालना लोकसभा मतदार संघात पुन्हा काँग्रेसचे माजी आमदार डॉ कल्याण काळे निवडणूक लढणार आहेत. डॉ कल्याण काळे यांनी 2009 मध्ये रावसाहेब दानवे यांना चांगलाच धक्का दिला होता. आता हाच पॅटर्न पुन्हा जालना लोकसभेमध्ये पाहायला मिळणार का, अशीच चर्चा सध्या जालना लोकसभा मतदारसंघांमध्ये पाहायला मिळत आहे. तर भाजपाच्या गटातून सुद्धा उलट सुलट चर्चा सुरू असल्याचं चित्र जालना लोकसभा मतदारसंघात पाहायला मिळत आहे. “2009 मध्ये काँग्रेसची सत्ता होती, आता गल्ली ते दिल्ली भाजपाची सत्ता आहे. त्यामुळे डॉ कल्याण काळे यांना उमेदवारी मिळाल्यानं रावसाहेब पाटील दानवे यांना कसलाही परिणाम होणार नाही. उलट रावसाहेब दानवे भरघोस मतांनी विजयी होणार,” अशी चर्चा सध्या मतदारसंघात जोर धरत आहे.


