
सिंगापूर फूड एजन्सी (SFA) ने गुरुवारी, एव्हरेस्टच्या फिश करी मसाला या लोकप्रिय भारतीय मसाल्याच्या ब्रँडची उत्पादने बाजारातून परत मागवून घेतली आहेत. या मसाल्यात इथिलीन ऑक्साईड हे एक कीटकनाशक आढळून आल्याने हा निर्णय घेण्यात आल्याचे समजतेय. सिंगापूर फूड एजन्सीने आयातदार SP मुथिया आणि सन्स यांना सदर प्रकरणी निर्देश दिले आहेत.
नेमकं घडलं काय?
एसएफएने स्पष्ट केले की इथिलीन ऑक्साईड हे अन्नामध्ये वापरण्यासाठी सुरक्षित नसतानाही, काहीवेळा कृषी उत्पादकांकडून निर्जंतुकीकरणासाठी याचा वापर रोपांवर केला जातो. जेव्हा या रोपांमधून पुढे विविध पदार्थ तयार होतात या इथिलीन ऑक्साईडचा काही अंश त्यातली शिल्लक राहू शकतो. काही तज्ज्ञांच्या माहितीनुसार, कमी प्रमाण असल्यास लगेचच याचा आरोग्याला धोका निर्माण होत नाही पण सातत्याने असे पदार्थ आपल्या शरीरात जात असतील तर मात्र धोका संभवतो.




