![]()
रायगड: महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री बॅरिस्टर अंतुले यांचे जावई मुश्ताक अंतुले यांनी अजित दादांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. त्यामुळे राज्यात महाविकास आघाडीला मोठा दणका बसला आहे. मुश्ताक अंतुले यांनी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत मुंबई येथे काँग्रेसमधून राष्ट्रवादीत जाहीर प्रवेश केला आहे. अंतुले यांच्या प्रवेशावेळी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, प्रफुल्ल पटेल,धनंजय मुंडे व हसन मुश्रीफ आदी मान्यवर उपस्थित होते.
महाराष्ट्रातच नव्हे तर अवघ्या देशात पहिली कर्जमुक्ती कोणी दिली असेल तर ती अंतुले साहेबांनी दिली, असेही तटकरे यांनी सांगितले. कोकणचे सुपुत्र माजी मुख्यमंत्री बॅरिस्टर अंतुले यांनी जिल्ह्याचे नव्हे तर अवघ्या राज्याचे नेतृत्व केले. मुश्ताक अंतुले यांच्या प्रवेशाबद्दल समाधान व्यक्त करताना तटकरे म्हणाले की, १९६९ साली वसंतराव नाईक यांच्या मंत्रिमंडळामध्ये अंतुले साहेब राज्यमंत्री झाले त्यावेळेस टायर व्यवस्था होती.
अंतुले साहेबांचा स्वभाव आपल्याला माहित होता त्यांनी त्यावेळस स्पष्टपणे नाईक साहेबांना सांगितलं मी मंत्रिमंडळात उपमंत्री म्हणून येणार नाही. राज्यमंत्री पद महाराष्ट्रात सर्व प्रथम कोणामुळे आले तर ते बॅरिस्टर अंतुले यांच्यामुळे आले आणि मग थ्री टायर सिस्टम आली. मंत्री, राज्यमंत्री काहीवेळा उपमंत्री कोणाच्या आत्मसांगण्याप्रमाणे कुठे तडजोड न करता व्यापक भूमिका अंतुले साहेबांनी त्या कालावधीत घेतली, असे तटकरेंनी अंतुले यांची प्रशंसा करत म्हटले.



