पुणे : लोकसभा निवडणुकीचे निकाल ४ जून रोजी जाहीर होणार असले, तरी कोण जिंकणार याबद्दल जोरात चर्चा सुरू आहेत. अनेक ठिकाणी यातून वाद निर्माण होत असल्याचेही दिसत आहे. अशीच एक घटना घडली असून, यात एकाचा मृत्यू झाला आहे.
रामटेक लोकसभा मतदारसंघातील सिंगारखेडा गावात तरुणांमध्ये लोकसभा निवडणुकीच्या निकालाबद्दल चर्चा सुरू होती. कोण जिंकणार यावरून मतभेद झाले. वाद टोकाला जाऊन तरुणांमध्ये हाणामारी सुरू झाली. यात सतीश फुले या तरुणाचा मृत्यू झाला. या प्रकरणी पोलिसांनी प्रवीण बोरडे याला ताब्यात घेतले आहे.


