जालना : पोलीस भरती प्रशिक्षणासाठी जालन्यात आलेल्या वीस वर्षीय तरुणाचा मैदानावर कोसळून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी घडली.
पोलिस मुख्यालयाच्या मैदानावर धावत असताना या तरुणाचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. आकाश इटकर असं मयत तरुणाचा नाव असून, तो हिंगोली जिल्ह्यातील शेणगावचा रहिवासी आहे.
पोलीस भरती प्रशिक्षणासाठी 12 दिवसापूर्वीच तो जालन्यातली एका प्रशिक्षण अकॅडमीमध्ये भरती झाला होता. पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर धावण्याचा सराव करताना अचानक आकाश जमिनीवर कोसळला. त्यानंतर त्याला जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. डॉक्टरांनी तपासणी करून त्याला मृत घोषित केलं.



