पुणे: ‘माझ्याबद्दल गैरसमज करण्याचा प्रयत्न केला जात आहे. ज्या घटना घडल्या त्याबाबत माझं फडणवीसांशी बोलणं झालं. राजकीय व्यक्तीचा हस्तक्षेप होऊन न देता चौकशी व्हावी. तसंच या प्रकरणातील दोषींवर कडक कारवाई व्हावी हीच अपेक्षा आहे.
आज सकाळीच मी पोलीस आयुक्तांशी बोललो. पालकमंत्री म्हणून मी प्रकरणावर लक्ष ठेऊन आहे. अनधिकृत पब आणि बारवर कारवाई करण्यात आली. आचारसंहिता शिथिल करा अशी निवडणूक आयुक्तांना विनंती करणार.’ असं अजित पवार माध्यमांसमोर म्हणाले.




