डोंबिवली : डोंबिवली एमआयडीसी फेज २ मध्ये अमुदान केमिकल कंपनीत २३ मे रोजी झालेल्या भीषण स्फोटात ६ जण मृत्यूमुखी पडले होते. या घटनेला ४५ तास उलटून गेल्यानंतरही कंपनीच्या आवारात आणि परिसरात शोधकार्य सुरु आहे. कंपनीच्या ढिगाऱ्याखाली आणि छतांवर एनडीआरएफच्या जवानांना मृतदेहांचे अवशेष सापडत आहेत.
कंपनी परिसरात मानवी हात, पाय असे अवशेष आढळून येत आहेत. त्यामुळे शोधकार्य आजही सुरूच राहणार आहे. शोधकार्य संपल्यानंतरच या घटनेत किती मृत्यू झाले ते स्पष्ट होईल. या प्रकरणात अटक केलेले अमुदान कंपनीचे मालक मालती मेहता आणि मलय मेहता यांना आज कल्याणच्या न्यायालयात हजर केले जाणार आहे.