मुंबई : विधानपरिषदेच्या ४ जागांसाठीच्या नव्याने निवडणूक कार्यक्रमाची घोषणा करण्यात आली आहे. यापूर्वी १० जून रोजी आयोगाने ही निवडणूक जाहीर केली होती, परंतु विविध शिक्षक संघटनांनी आक्षेप घेतल्याने तो कार्यक्रम रद्द करण्यात आला होता. आता मुंबई आणि कोकण पदवीधर मतदार संघ, तसेच नाशिक आणि मुंबई शिक्षक मतदार संघ अशा ४ जागांसाठी ही निवडणूक होणार आहे. नव्या कार्यक्रमानुसार पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकांसाठी २६ जून रोजी मतदान होईल.
निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या निवडणूक कार्यक्रमात २ पदवीधर आणि २ शिक्षक मतदारसंघांचा समावेश आहे. मुंबई पदवीधर मतदार संघातून संजय पोतनीस तर कोकण पदवीधर मतदार संघातून निरंजन डावखरे यांची मुदत ७ जुलै रोजी संपत आहे.