मुंबई: अमेरिका आणि वेस्ट इंडिज यंदा संयुक्तपणे टी-२० वर्ल्डकप स्पर्धेचे आयोजन जाणार आहे. भारतीय संघाची पहिली तुकडी अमेरिकेला पोहोचली असून न्यूयॉर्कमधील नासाऊ काऊंटी येथील गार्डन सिटीमध्ये सध्या मुक्काम ठोकला आहे. भारतीय संघाचा पहिला सामना बांगलादेशशी होणार आहे, पण क्रिकेट चाहत्यांना नेहमीप्रमाणे भारत-पाकिस्तान सामन्याची उत्सुकता लागून आहे.
भारत-पाकिस्तान सामन्यावर दहशतवादी सावट
दोन्ही प्रतिस्पर्धी सध्या केवळ आयसीसी स्पर्धेत एकमेकांसमोर येतात अशा स्थितीत, लोकांमधील उत्सुकता साहजिक आहे. मात्र, असेही काही आहेत जे खेळ बिघडवण्याचा प्रयत्न करत आहेत. न्यूयॉर्कमध्ये होणाऱ्या बहुचर्चित मॅचवर ISIS-K (खोरासान) या दहशतवादी संघटनेची नापाक नजर असून हल्ल्याची शक्यता लक्षात घेऊन न्यूयॉर्क पोलिसांनी सुरक्षा बंदोबस्तात वाढ केली आहे.



