पुणे :
पुणे : पुणे तिथे काय उणे हे उगाच म्हणत नाही. पुणेकर कधी काय करतील याचा काही नेम नाही. असाच एका पुणेरी तरुणाचा व्हिडीओ व्हायरल होत आहे जो पाहून तुम्हाला धक्का बसू शकतो. व्हायरल व्हिडीओमध्ये एक तरुण पावसाचा लुटताना दिसत आहे पण ज्या पद्धतीने तो पावसाच्या पाण्यात खेळत आहे ते पाहून नेटकरी थक्क झाले आहेत.
https://www.instagram.com/reel/C73j_x9I0Ma/?igsh=MWF1M2w5a3h1bnhsbQ==
पावसाच्या पाण्यात भिजण्याचा मोह सर्वांनाच होतो. तुम्ही अनेकदा लहान मुलांना धो धो कोसळणाऱ्या पावसात भिजताना पाहिले असेल. कोणी रस्त्यावरून वाहणाऱ्या पाण्यात कागदाची होडी करून सोडातात. सध्या पावसाचा आनंद लुटणाऱ्या तरुणाचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे हा तरुण भररस्त्यात साचलेल्या पावसाच्या पाण्यामध्ये खेळताना दिसत आहे.



