)
लोकसभेच्या निवडणुकांची रणधुमाळी नुकतीच पार पडली आहे. या निवडणुकीत भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीए (NDA) आघाडीला बहुमत मिळालं आहे. उद्या (9 जून) नरेंद्र मोदी हे तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेणार आहेत. दरम्यान, एनडीए आघाडीच्या विजयात महत्वाची भूमिका आंध्र प्रदेशमधील तेलगू देसमचे अध्यक्ष चंद्राबाबू नायडू यांनी बजावली आहे. या निवडणुकीच्या काळातच नायडू कुटुंब मालामाल झालं आहे. फक्त पाचच दिवसात चंद्राबाबू नायडू यांच्या पत्नीच्या खात्यात 870 कोटी आले आहेत.
चंद्राबाबू नायडू यांच्या हेरिटेज फुड्स कंपनीच्या शेअर्समध्ये तब्बल 55 टक्क्यांची वाढ झालीय. त्यामुळं चंद्राबाबू नायडू यांच्या कुटुंबियांच्या संपत्तीत 870 कोटी रुपयांची वाढ झाली आहे. दरम्यान, लोकसभा निकालाच्या आधी एक्झिट पोल हाती आले होते.
यानुसार केंद्रात भाजपची सत्ता येणार आणि आंध्र प्रदेशात तेलगू देसम पक्षाची सत्ता येणार असा अंदाज वर्तवण्यात आला होता. त्याप्रमाणे आंध्र प्रदेशात चंद्राबाबू नायडू यांच्या पक्षाला बहुतमत मिळालं आहे. तर लोकसभेच्या 16 जागा त्यांच्या पक्षाला मिळाल्या आहेत. याकाळातच चंद्राबाबू यांच्या कंपनीने त्यांना मालामाल केलं आहे. त्यांच्या कंपनीच्या शेअर्समध्ये कमालीची वाढ झाली आहे. याचा मोठा फायदा त्यांना झाला आहे.




