
लोकसभा निवडणुकीत भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीला (एनडीए) बहुमत मिळालं असून नरेंद्र मोदी हे तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेणार आहेत. यावेळी काही खासदारांना देखील मंत्रिपदाची शपथ देण्यात येण्याची शक्यता आहे. राज्यातील सहा खासदारांना यंदा मंत्रिपदाची संधी मिळाली आहे. यामध्ये महायुतीतील शिंदे गट आणि भाजप खासदारांचा समावेश आहे. मात्र महायुतीचा भाग असलेल्या अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला मंत्रिमंडळात स्थान मिळणार नसल्याचे म्हटलं जातंय. तसेच मंत्रिपदावरुन सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांच्यात रस्सीखेंच सुरु असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे.
लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने ४ जागांवर निवडणूक लढवली होती. सुनील तटकरे हे रायगड मतदारसंघातून निवडून आले आहेत. तर प्रफुल्ल पटेल राज्यसभेचे खासदार आहेत. अशातच केंद्रीय मंत्रिमंडळात सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल दोघेही इच्छुक असल्याचे म्हटलं जात आहे.



