
जळगाव : मंत्री चंद्रकांत पाटील हे जळगाव येथील काही महिन्यांपूर्वी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात कार्यक्रमानिमित्त आले होते त्या ठिकाणी चंद्रकांत पाटील यांनी मुलींना उच्च शिक्षण मोफत देण्याची घोषणा केली होती मात्र ही घोषणा मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या स्मृती मर्यादित राहिल्याने रोहिणी खडसे हे त्यांना आठवण म्हणून बदाम पाठविणार आहे असे खडसे म्हणाल्या..
मुलींना उच्च शिक्षण मोफत देण्याच्या घोषणाची अंमलबजावणी तातडीने करावी अशी मागणी एडवोकेट रोहिणी खडसे यांनी केली आहे, यासाठी त्या राज्याच्या उच्च व त्यांचा शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांना स्मरणपत्र आणि स्मरणशक्ती येण्यासाठी सोबत बदाम पाठवून आगळे वेगळे आंदोलन करणार आहेत.



