मध्य प्रदेशातील गुना येथे पारधी समाजातील एका २५ वर्षीय आदिवासी तरुणाचा पोलीस कोठडीत मृत्यू झाला. त्यामुळे स्थानिकांनी पोलीस ठाण्यात आंदोलन सुरू केले. पीडितेच्या मृत्यूप्रकरणी पीडितेच्या नातेवाईकांनी जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊनही संताप व्यक्त केला. हा संताप इतका टोकाचा होता की काही महिलांनी स्वतःचा कपडेही काढले. एनडीटीव्हीने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयात महिला खाली बसून रडत होत्या. तर काही महिलांनी कपडे काढून निषेध नोंदवला. या प्रकरणामुळे पोलिसांनी त्यांना कार्यालयाच्या बाहेर जाण्याचे निर्देश दिले. मात्र यामध्ये झटापट झाली. परिणामी एका महिलेच्या डोक्यातून रक्तस्राव होऊ लागला. महिलांच्या हातातील बांगड्या फुटल्याने एक पोलीस कर्मचारीही जखमी झाला.




