
कर्नाटकची राजधानी बंगळुरुमध्ये एक धक्कादायक घटना घडला आहे. धोतर घातलेल्या शेतकऱ्याला मॉलमध्ये प्रवेश नाकारण्यात आला. पोरानं बापाला चित्रपट दाखवण्यासाठी तिकिट बूक केलं होतं. पण मॉलमध्ये पोहचल्यानंतर सुरक्षा कर्मचाऱ्याने त्यांना प्रवेश नाकारला. त्या शेतकऱ्याने धोतर घातले होते, त्यामुळे मॉलमध्ये जाण्यास मज्जाव करण्यात आला. याप्रकरणाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. नेटकऱ्यांकडून संतप्त प्रतिक्रिया येत आहेत. त्याशिवाय शेतकऱ्यांचं समर्थ करणाऱ्या काही कन्नड संघटनांनी मॉलमध्ये आंदोलन केले. त्याशइवाय मॉलच्या मॅनेजमेंटला यासंदर्भात जाब विचारला.
नेमकं झालं काय ?
पेशानं शेतकरी असणारे नागराजप्पा कुटुंबासह मॉलमध्ये चित्रपट पाहण्यासाठी पोहचला होता. त्यांच्याकडे चित्रपटाची तिकेटही होती, जी ऑनलाईन बूक करण्यात आली होती. पण पारंपारिक पोषाक परिधान करणाऱ्या नागराजप्पा यांना मॉलमध्ये प्रवेश नाकारण्यात आला. धोत घातल्यामुळे सुरक्षा कर्मचाऱ्यानं त्यांना जाण्यास मज्जाव घातला. नागराजप्पा आणि त्यांच्या मुलाने आपल्याकडील तिकिटे दाखवत, आतमध्ये सोडण्याची विनंती केली. पण उपस्थित असणाऱ्या सुरक्षा कर्मचाऱ्यानं त्यांच्यासोबत आपत्तीजनक वागणूक दिली. या प्रकाराचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. त्यानंतर काही कन्नड संघटनांमधील सदस्यांनी धोतर घालत या घटनेचा विरोध दर्शवला. प्रकरण अधिक गंभीर झाल्यानंतर मॉलमध्ये पोलिस तैणात करण्यात आले.




