
कऱ्हाड : कोयना धरण पाणलोट क्षेत्रात कोसळणाऱ्या मुसळधार पावसाने रविवारी आणि सोमवारी सकाळपासून थोडी विश्रांती घेतली आहे. पावसाचा जोर कमी झाल्याने कोयना धरणातील पाणी साठ्यात येणाऱ्या पाण्याची आवकही कमी झाली आहे.
सध्या धरणात ४५ हजार ६११ क्युसेक आवक होत आहे. धरणातून सोडण्यात आलेला ५० हजार क्युसेक विसर्ग कमी करुन, तो ४० हजारवर करण्यात आला आहे. त्यामुळे कृष्णा-कोयनेसह अन्य नद्यांच्या पाणी पातळीत घट होणार आहे. त्यामुळे नदीकाठी पुरापासून दिलासा मिळाला आहे.
कोयना धरण पाणलोट क्षेत्रात गेल्या तीन आठवड्यापासून मुसळधार पाऊस कोसळत होता. त्यामुळे कोयना धरणाच्या पाणी पातळीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली होती. कोयना धरणात पाण्याची आवक वाढल्याने पावसाळ्यात पहिल्यांदाच २५ जुलै २०२४ रोजी धरणाचे सहा वक्र दरवाजे उचलून १० हजार क्युसेक पाणी सोडण्यात आले. त्यानंतर त्याच रात्री सात वाजता पुन्हा १० हजार क्युसेकने वाढ करुन नदीत २० हजार क्युकेस सोडण्यात आले.
.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)

