.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा योजनेंतर्गत ”मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा” हे स्पर्धात्मक अभियान पहिल्या टप्प्यात यशस्वी झाल्यानंतर त्याचा दुसरा टप्पा राज्य शासनाने हाती घेतला आहे. येत्या सोमवारी (ता.५) ते ४ सप्टेंबर या महिनाभराच्या कालावधीत हे अभियान राबविले जाईल.
त्यानंतर ५ ते १५ सप्टेंबर या काळात मूल्यांकनाची प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे. शैक्षणिक गुणवत्तेबरोबरच आरोग्य, स्वच्छता, पर्यावरण, क्रीडा आदी घटकांबाबत जागृती करून विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासास चालना देण्याच्या उद्देशाने हे अभियान राबविण्यात येत आहे. यासाठी रविवारपर्यंत (ता.४ ) अभियानाची पूर्वतयारी करण्यात येईल. सोमवारी (ता.५) औपचारिक कार्यक्रमाद्वारे अभियानाची सुरुवात होईल. हे अभियान एक महिना कालावधीसाठी राहणार आहे.
२०२३-२४ मध्ये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा हे स्पर्धात्मक अभियान राज्यातील सर्व शाळांसाठी राबविण्यात आले होते. या अभियानाला विद्यार्थी व शिक्षकांबरोबरच विद्यार्थी, पालकांनी प्रतिसाद दिला.




