
मुंबई : मुंबईच्या रस्त्यावर टॉवेल गुंडाळून फिरताना एका तरुणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. डिजिटल क्रिएटर आणि मिंत्रा फॅशन सुपरस्टार विजेती तनुमिता घोषचा हीचा मुंबईच्या पवई भागात शुट केलेला व्हिडिओ चर्चेत आला आहे. ती गुलाबी टॉवेल परिधान करून रस्त्यावर चालताना दिसते आहे. घोषने तिच्या इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये, ती बस स्टॉपवरून जवळच्या हॉटेलमध्ये चालत असताना आणि एका बेंचवर बसताना लोक तिच्याकडे आश्चर्याने बघत आहे.
https://www.instagram.com/reel/C9KWABOSvfH/?utm_source=ig_web_button_share_sheet
मुंबईच्या तरुणीचा जुना व्हिडीओ व्हायरल
पुढच्या क्षणी जे घडले ते पाहून नेटकऱ्यांना धक्काच बसला. घोषने तिच्यांना गुंडाळलेला टॉवेल काढते आणि नंतर अंगाभोवती गुंडाळेला टॉवेल देखील काढते पण टॉवेलच्या आतमध्ये तिने एक सुंदर निऑन पिवळ्या रंगाचा ड्रेस परिधान केल्याचे दिसते. पण तिची कृती नेटकऱ्यांना आवडली नाही.


