पुणे : राज्यातील राजकीय पक्षांनी मराठा आरक्षणाबाबत आपली भूमिका स्पष्ट करण्याची मागणी मराठा समाजानं केली. त्यासाठी नेत्यांच्या घराबाहेर मराठा समाज आंदोलन करत आहे. आज मराठा समाजाकडून शरद पवार यांच्या पुण्यातील घराबाहेर आंदोलन करण्यात आलं. यावर मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी गंभीर आरोप केला.
फडणवीस आणि दरेकर यांचं कारस्थान
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर आज मराठा समाजाच्या वतीनं राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या पुण्यातील घराबाहेर आंदोलन करण्यात येत आहे. याबाबत जरांगे पाटील यांना विचारलं असता ते म्हणाले, “हे देवेंद्र फडणवीस आणि प्रवीण दरेकर यांचं कारस्थान आहे. मराठा समाज हा एकत्र झाला आहे. मात्र, त्यांना समाजात फूट दाखवायची आहे. देवेंद्र फडणवीस यांचं एकच स्वप्न आहे की, त्यांना मराठा समाजात फूट दाखवायची आहे. पण मराठ्यात फूट पडणार नाही. मी जोपर्यंत आहे तोपर्यंत फडणवीस यांचं स्वप्न पूर्ण होऊ देणार नाही.



