जळगाव : राज्याच्या राजकारणातून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जीवाला धोका असल्याची बातमी समोर आली आहे. या घटनेमुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे. अजित पवारांची जनसन्मान यात्रा सुरु झाली आहे. अशातच आता त्यांना सुरक्षेचा अलर्ट जारी करण्यात आला आहे.
महाराष्ट्र पोलिसांना एक मोठी माहिती मिळाली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जीवाला धोका असल्याची माहिती गुप्तचर यंत्रणांना मिळाली आहे. गृह विभागाला सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या काही दिवसांपासून राज्यातील बदललेल्या राजकीय वातावरणात उपमुख्यमंत्री अजित पवार किंवा त्यांच्या ताफ्यावर हल्ला होण्याची शक्यता वर्तवली आहे.
पोलीस प्रशासन अलर्ट मोडवर
यासंदर्भात अजित पवारांना काळजी घेण्याच्या सूचना आल्यानंतर त्यांनी या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे. आम्ही लोकप्रतिनिधी आहोत त्यामुळे दौरा आम्ही करणारच. तसेच पोलिसांचे काम आहे सुरक्षा देणे त्यामुळे तिथे काही चुकीचं घडू नये याकडे लक्ष देणे, ते याची काळजी घेतील, अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिली आहे.


