ejanashakti news : पतंजलीच्या उत्पादनांच्या दिशाभूल करणाऱ्या जाहिराती केल्याप्रकरणी पतंजलीवर मानहानीचा खटला सर्वोच्च न्यायालयात काही महिन्यांपासून सुरु होता. आता या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने बाबा रामदेव आणि आचार्य बालकृष्ण यांना मोठा दिलासा दिला आहे. पतंजलीवरील मानहानीचा खटला सर्वोच्च न्यायालयाने बंद केला आहे. हा निर्णय न्यायमूर्ती हिमा कोहली आणि संदीप मेहता यांच्या खंडपीठाने दिला आहे.
पतंजलीने उत्पादनांच्या दिशाभूल करणाऱ्या जाहिराती केल्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात मागील काही महिन्यांपासून सुनावणी सुरु होती. या सुनावणीवेळी बाबा रामदेव आणि पतंजलीचे एमडी आचार्य बालकृष्ण हे देखील अनेकदा सर्वोच्च न्यायालयात हजर राहिले होते. दिशाभूल करणाऱ्या जाहिराती केल्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने बाबा रामदेव आणि आचार्य बालकृष्ण यांना अनेकदा फटकारलं होतं. तसेच या प्रकरणात बाबा रामदेव आणि आचार्य बालकृष्ण यांनी न्यायालयात माफीही मागितली होती.




