मुंबई: लोकसभा निवडणुकीत सुसाट कामगिरी करणाऱ्या महाविकास आघाडीनं विधानसभा निवडणुकीतही तशीच कामगिरी करण्याचा चंग बांधला आहे. तर महायुतीनं सत्ता राखण्यासाठी कंबर कसली आहे. लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून अधिकाधिक महिला मतदान मिळवण्याचा महायुती सरकारचा प्रयत्न आहे. तर दुसरीकडे विरोधकांनी विविध आघाड्यांवर सत्ताधारी अपयशी ठरल्याचं म्हणत प्रचाराची राळ उडवून दिली आहे.
राज्यात आता निवडणूक झाल्यास कोणाला किती जागा मिळतील, याबद्दल वरिष्ठ सेफॉलॉजिस्ट दयानंद नेने यांनी १६ ते २५ ऑगस्ट दरम्यान एक सर्वेक्षण केलं. त्यानुसार लाडकी बहीण योजनेमुळे जनमानसात फारसा परिणाम झाला नसल्याचं दिसून आलं. कायदा-सुव्यवस्था आणि बेरोजगारीचा विषय राज्यातील जनतेला सर्वाधिक महत्त्वाचे वाटतात. त्यामुळे याच मुद्द्यावर राज्यातील जनता मतदान करेल, असा अंदाज आहे.
सरकारचा कारभार कसा?
महायुती सरकारचा कारभार सर्व्हेत सहभागी झालेल्या २८ टक्के लोकांना चांगला, तर २० टक्के लोकांना समाधानकारक वाटतो. २० टक्के लोकांना सरकारची कामगिरी खराब, तर २१ टक्के लोकांना असमाधानकारक वाटते. ११ टक्के लोकांनी माहीत नाही हा पर्याय निवडत तटस्थ राहणं पसंत केलं.
आता निवडणूक झाल्यास कोणाला किती जागा?
नेनेंनी जुलैच्या अखेरीस केलेल्या सर्वेक्षणात मविआला १५८, तर महायुतीला १२२ जागा दाखवण्यात आल्या होत्या. आता दीड महिन्यांनंतर त्यांनी दुसरं सर्वेक्षण केलं. या कालावधीत जनमत फारसं बदललेलं नाही. मविआला १५२, तर महायुतीला १२३ जागा मिळण्याचा अंदाज आहे. राज्यात सरकार स्थापन करण्यासाठी १४५ जागा जिंकणं गरजेचं आहे.
कोण आघाडीवर.. कोण पिछाडीवर…
विदर्भ, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात महाविकास आघाडी पुढे असेल असा अंदाज आहे. तर उत्तर महाराष्ट्र, ठाणे, कोकण आणि पुण्यात महायुती आघाडीवर राहण्याची शक्यता आहे. मुंबईत महाविकास आघाडी पुढे असली तरी महायुती कडवी टक्कर देईल असं सर्व्हे सांगतो. महायुतीला सात जिल्ह्यांमध्ये भोपळा मिळेल असा अंदाज आहे. नंदूरबार, अमरावती, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, परभणी, पालघरमध्ये महायुतीला एकही जागा मिळणार नाही, असं सर्व्हे सांगतो. तर छत्रपती संभाजीनगरात मविआला खातं उघडता येणार नाही, असा अंदाज आहे. संभाजीनगरमध्ये शिवसेनेची ताकद आहे. पक्षात पडलेल्या फुटीनंतर संभाजीनगरमध्ये ठाकरेंना धक्का बसताना दिसत आहे.
कोणत्या जिल्ह्यात कोण वरचढ?
नंदूरबार- ४
मविआ ४, महायुती ०
धुळे- ३
मविआ ३, महायुती २
जळगाव- ११
मविआ ४, महायुती ७
बुलढाणा- ७
मविआ ३, महायुती ४
अकोला- ५
मविआ ४, महायुती १
वाशिम- ३
मविआ २, महायुती १
अमरावती- ८
मविआ ६, महायुती २ अन्य
वर्धा- ४
मविआ २, महायुती २
नागपूर- १२
मविआ ८, महायुती ४
भंडारा- ३
मविआ ३, महायुती ०
गोंदिया- ४
मविआ ४, महायुती ०
गडचिरोली- ३
मविआ ३, महायुती ०
चंद्रपूर-६
मविआ ५, महायुती १
यवतमाळ-७
मविआ २, महायुती ५
नांदेड-९
मविआ ३, महायुती ६
हिंगोली- ३
मविआ १, महायुती २
परभणी-४
मविआ ४, महायुती ०
जालना- ५
मविआ ४, महायुती १
संभाजीनगर- ९
मविआ ०, महायुती ७, अन्य २
नाशिक १५
मविआ ९, महायुती ५ ,अन्य १
पालघर- ६
मविआ २, महायुती ०, अन्य ४
ठाणे-१८
मविआ ५, महायुती १२, अन्य १
मुंबई-३६
मविआ २१, महायुती १५
पुणे- २१
मविआ ५, महायुती १६
नगर- १२
मविआ ७, महायुती ५
बीड-६
मविआ ३, महायुती ३
लातूर- ६
मविआ ४, महायुती २
धाराशिव- ४
मविआ २, महायुती २
सोलापूर- ११
मविआ ७, महायुती ४
सातारा- ८
मविआ ४, महायुती ४
कोल्हापूर-११
मविआ ८, महायुती २
सांगली- ८
मविआ ६, महायुती २
रत्नागिरी- ५
मविआ २, महायुती ३
सिंधुदुर्ग- ३
मविआ १, महायुती २
रायगड-७
मविआ १, महायुती ६