नागपूर : राजकारणातील नेते मंडळी जसे बोलतात तसे करत नाहीत, अशी नागरिकांची भावना आहे. त्यामुळे नेत्यांबद्दलची विश्वसनीयता कमी होत आहे. लोकांना मूर्ख बनविणे सोपे आहे पण विश्वसनीयता कमविणे कठीण गोष्ट आहे, असे स्पष्ट प्रतिपादन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले.
शनिवारी नागपुरात आयोजित अखिल भारतीय महानुभाव परिषदेच्या उद्घाटनीय कार्यक्रमात ते बोलत होते. गडकरी म्हणाले,
समाजात जातीय आणि आर्थिक विषमता निर्माण झाली आहे. परंतु, कोणीही जातीने मोठा होत नाही, गुणांनी मोठा होतो. त्यामुळे जातीयवाद संपला पाहिजे. हाच संदेश चक्रधर स्वामींनीही दिला आहे. चक्रधर स्वामींनी जे विचारधन दिले आहे ते समाजाला दिशा दाखविणारे आहे. समाजाला कल्याणाशी आणि प्रबोधनाशी जोडले पाहिजे. समाज प्रबोधनाचा संबंध लोक संस्काराशी आहे, असेही गडकरी म्हणाले.