जम्मू : जम्मू आणि काश्मीरमध्ये प्रथमच राष्ट्रध्वज आणि राज्यघटनेखाली निवडणूक होत असून ती ऐतिहासिक असल्याचा दावा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी शनिवारी केला.
विधानसभा निवडणुकीनंतर जम्मू-काश्मीरला राज्याचा दर्जा परत दिला जाईल असे आश्वासन त्यांनी दिले. केंद्र सरकारने पाच वर्षांपूर्वी अनुच्छेद ३७० रद्द करतानाच जम्मू आणि काश्मीर राज्याचे द्विभाजन केले होते. त्यामुळे जम्मू व काश्मीर तसेच लडाख यांचे दोन स्वतंत्र केंद्रशासित प्रदेशांची निर्मिती करण्यात आली होती.