पुणे : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला आहे. शिवसेना ठाकरे गटाने कोथरूड आणि हडपसर विधानसभा मतदारसंघांवर दावा सांगितल्याने राष्ट्रवादी शरद पवार गटापुढे अडचण निर्माण झाली आहे.
हडपसर विधानसभा मतदारसंघावर शिवसेनेने दावा सांगितला आहे. माजी आमदार महादेव बाबर आणि नुकतेच शिवसेनेत दाखल झालेले वसंत मोरे या ठिकाणाहून लढण्यासाठी इच्छुक आहेत. शिवसेनेला जिल्ह्यातही फारसे मतदारसंघ मिळतील अशी परिस्थिती नाही. त्यामुळे पुणे शहरातून कोथरूड आणि हडपसरसाठी ठाकरे यांनी आग्रह धरल्याचे सांगण्यात येत आहे.
त्यामध्ये कोथरूड हा मतदारसंघ शिवसेनाच लढेल, याबद्दल महाविकास आघाडीत स्पष्टता आहे. मात्र, हडपसर विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचा आमदार निवडून आल्याने हा मतदारसंघ ‘राष्ट्रवादी कडे राहील, अशी माहिती आहे.



