
आंध्रप्रदेश: मद्यप्रेमींसाठी दिलासादायक बातमी समोर येत आहे. आंध्रप्रदेशातील मद्यप्रेमींना आता स्वस्त दारूची व्यवस्था सरकारने केली आहे. आंध्र प्रदेशच्या चंद्राबाबू नायडू सरकारने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री एन चंद्राबाबू नायडू यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी (दि.१८) राज्य मंत्रिमंडळाची बैठक झाली. ज्यामध्ये राज्याच्या नवीन दारू धोरणाला मंजुरी देण्यात आली आहे. या धोरणाची अंमलबजावणी झाल्यानंतर लोकांना त्यांचा आवडता ब्रँड फक्त ९९ रुपयांना खरेदी करता येणार आहे.
नवीन नियम पुढील महिन्याच्या सुरुवातीपासून म्हणजेच १ ऑक्टोबरपासून लागू होणार आहेत. नव्या धोरणात राज्यसरकारने सर्व ब्रँडच्या दारूच्या किमती कमी केल्या आहेत. नवीन नियम लागू झाल्यानंतर आंध्रप्रदेशातील लोक कोणत्याही ब्रँडची दारू फक्त ९९ रुपयांना विकत घेऊ शकतील



