मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज आपल्या पक्षाची 38 जणांची उमेदवारी जाहीर केली. जाहीर केलेल्या यादीत 15 मराठा उमेदवारांचा समावेश आहे. त्याचबरोबर सर्व जाती आणि धर्मातील लोकांना समान न्याय देण्याचा प्रयत्न अजितदादांनी केला असल्याचे स्पष्ट झाले आहे.
तथापि, यादीत नवाब मलिक आणि त्यांची मुलगी, तसेच पुण्यातील वादग्रस्त सुनील टिंगरे आणि आमदार देवेंद भुयार यांचे नाव नाही, ज्यामुळे चर्चा अधिक सुरू झाली आहे. भाजपच्या विरोधामुळे या उमेदवारांचे नाव नसल्याचे मानले जात आहे.
अजित पवार यांच्या या निर्णयामुळे आगामी निवडणुकीत विविधता आणि समानतेच्या मुद्द्यावर लक्ष केंद्रीत करण्यात आले आहे, परंतु काही महत्त्वाच्या नावे नसल्यामुळे त्यांचे समर्थन आणि विरोध दोन्हीही चर्चेला उधाण आले आहे.
विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ उमेदवारांची पहिली यादी
१) बारामती – श्री. अजित पवार
२) येवला – श्री. छगन भुजबळ
३) आंबेगाव – श्री. दिलीप वळसे-पाटील
४) कागल -श्री. हसन मुश्रीफ
५) परळी – श्री. धनंजय मुंडे
६) दिंडोरी – श्री. नरहरी झिरवाळ
७) अहेरी – श्री. धर्मराव बाबा आत्राम
८) श्रीवर्धन – कु. आदिती तटकरे
९) अंमळनेर -श्री. अनिल भाईदास पाटील
१०) उदगीर – श्री. संजय बनसोडे
११)अर्जुनी मोरगाव -श्री. राजकुमार बडोले
१२)माजलगाव :- श्री. प्रकाश दादा सोळंके
१३) वाई – श्री. मकरंद पाटील
१४) सिन्नर -श्री. माणिकराव कोकाटे
१५)खेड आळंदी – श्री. दिलीप मोहिते
१६) अहमदनगर शहर -श्री. संग्राम जगताप
१७)इंदापूर -श्री. दत्तात्रय भरणे
१८)अहमदपूर -श्री. बाबासाहेब पाटील
१९) शहापूर – श्री. दौलत दरोडा
२०) पिंपरी -श्री. अण्णा बनसोडे
२१)कळवण – श्री. नितीन पवार
२२)कोपरगाव – श्री. आशुतोष काळे
२३)अकोले – डॉ. किरण लहामटे
२४)बसमत – श्री. चंद्रकांत उर्फ राजू नवघरे
२५)चिपळूण – श्री. शेखर निकम
२६)मावळ – श्री. सुनील शेळके
२७)जुन्नर – श्री. अतुल बेनके
२८)मोहोळ – श्री. यशवंत विठ्ठल माने
२९)हडपसर – श्री. चेतन तुपे
३०)देवळाली – श्रीमती. सरोज आहिरे
३१) चंदगड – श्री. राजेश पाटील
३२) इगतपुरी – श्री. हिरामण खोसकर
३३) तुमसर – श्री. राजू कारेमोरे
३४) पुसद – श्री. इंद्रनील नाईक
३५)अमरावती शहर – सौ. सुलभा खोडके
३६) नवापुर – श्री. भरत गावित
३७) पाथरी – श्रीमती निर्मला उत्तमराव विटेकर
३८) मुंब्रा-कळवा – श्री. नजीब मुल्ला



