भाजप नेते सदाभाऊ खोत यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर केलेल्या टिकेमुळे राज्यात नवीन वाद निर्माण झाला आहे. पवारांना महाराष्ट्राचा चेहरा बदलायचा आहे, आता महाराष्ट्र तुमच्या चेहऱ्यासारखा करणार का? असं वादग्रस्त वक्तव्य खोत यांनी केलं आहे. यावरून महाविकास आघाडीकडून जोरदार टीका केली जाते आहे. पवारांच्या आजारपणावरून अशा शब्दात टीका केल्याने सदाभाऊ खोत आता विरोधकांकडून टार्गेट होत आहेत.अशात अजित पवार गटाच्या नेत्या रुपाली ठोंबरे पाटील यांनीही सदाभाऊ यांना खडेबोल सुनावले आहेत.
“सदा खोत तुम्ही जी मा.शरदजी पवार साहेब यांच्या बाबतीत भाषा वापरलेली ती अत्यंत असभ्य आहे,अशोभनीय आहे. आपण त्वरित माफी मागितली पाहिजे.दिलगिरी व्यक्त केली पाहिजे. नाहीतर बुक्कीत ठेंगुळ निघेल.जरा बोलताना भान ठेवून बोलत जावा. पक्ष वेगळे असेल तरी राजकारणातील लोक प्रतिनिधीनी बोलताना भान ठेवलेच पाहिजे. सदा खोत जाहीर निषेध असली भाषा चालणार नाही.”, अशी पोस्ट रुपाली ठोंबरे यांनी फेसबुकवर केली आहे.