![]()
नवी दिल्ली : रक्तातील साखर कमी करून चयापचय विकार व्यवस्थापित करण्यास मदत करण्यासाठी ओळखले जाणारे मेटफॉर्मिन या सामान्य मधुमेहविरोधी औषधामुळे गर्भाच्या वाढीस प्रतिबंध होऊ शकतो, असे एका अभ्यासातून समोर आले आहे. गर्भवती महिलांना मधुमेहाशी सबंधित परिस्थितीमुळे संभाव्य गुंतागुंतीचा धोका कमी करण्यासाठी दिले जाते. तथापि, मेटफॉर्मिन सेवनामुळे गर्भाच्या विकासावर दीर्घकालीन परिणामांबाबत चिंता व्यक्त करण्यात आली आहे.
गर्भधारणेदरम्यान मेटफॉर्मिनचे संचय मूत्रपिंड, यकृत, कंकाल स्नायू, हृदय आणि पोटाच्या अवयवांना समर्थन देण्यासाठी ओळखल्या जाणाऱ्या चरबीच्या साठ्याच्या प्रतिबंधित वाढीशी संबंधित असल्याचे आढळले. यामुळे गर्भाच्या शरीराचे वजन कमी झाले, असे संशोधकांनी सांगितले. अभ्यासात गर्भधारणेच्या ३० दिवसांच्या आत औषध सुरू झाल्यानंतर गर्भ वाढीस प्रतिबंध आणि मूत्रपिंडातील डिसमॉर्फोलॉजीसह मेटफॉर्मिनचे भ्रूण जैवसंचय दिसून आले. तथापि, संसोधकांनी मेटफॉर्मिनचे परिणाम अधिक समजून घेण्यासाठी अधिक अभ्यास करण्याची मागणी केली.,
संशोधकांनी गर्भवतींना विविध आहार देण्याच्या परिणामांचेदेखील विश्लेषण केले. अर्ध्या लोकांना १५ टक्के कॅलरीसह पारंपरिक आहार देण्यात आला, तर उर्वरित अर्ध्या लोकांना ३६ टक्के कॅलरीजसह उच्च चरबीयुक्त आहार मिळाला. त्यावरून मेटफॉर्मिनची पातळी आहारानुसार भिन्न नसल्याचेही स्पष्ट झाले.




