मुंबई : राज्यात पुन्हा एकदा महायुतीचं सरकार येणार हे स्पष्ट झालं आहे. महायुतीला 230 पेक्षा जास्त जागा मिळत असून, आता मुख्यमंत्री कोण होणार? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. दरम्यान विजयाच्या पार्श्वभूमीवर महायुतीने पत्रकार परिषद घेतली असता त्यात जुगलबंदी पाहण्यास मिळाली. एकनाथ शिंदे यांनी खऱ्या राष्ट्रवादीवरुन अजित पवारांना विचारलं असता त्यावर अजित पवारांनीही उत्तर दिलं. यानंतर पत्रकार परिषदेत एकच हास्यकल्लोळ सुरु झाला होता.
एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं की, “2019 ला जे सरकार स्थापन व्हायला हवं होतं, ते झालं नाही. लोकांनी हे चांगलंच लक्षात ठेवलं आहे. लोक हे विसरलेले नाहीत”. यानंतर त्यांनी अजित पवारांना, तुमचा कोणता पक्ष, राष्ट्वादी ना. आता तो कोणाचा आहे ते लोकांनी ठरवलं असं सांगितलं. त्यावर अजित पवारांनी शिवसेना कोणाची तेदेखीवल ठरवलं आहे असं उत्तर दिलं. यानंतर देवेंद्र फडणवीसांसह सर्वांनाच हसू अनावर झालं.



